ब्रेकिंग! अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका, उच्‍च न्‍यायालयाने….

दिल्‍ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या अटक बेकायदेशीर असल्‍याचा दावा करणार्‍या याचिकेवर आज दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने निर्णय दिला.

या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची ईडीची अटक वैध आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे. केजरीवाल यांच्‍या अटक कारवाईविरोधात दाखल याचिकेवर ३ एप्रिल रोजी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली होती.

केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी तर ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी जोरदार युक्‍तीवाद केला होता. यानंतर न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता.

Leave a Comment