मोठी बातमी! भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे, अजित पवारांना वगळले…

मुंबई : निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्याने राज्यातील प्रचारासाठी भाजपने सादर केलेल्या स्टार प्रचारकांच्या नवीन यादीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वगळले आहे. शिंदे आणि अजित पवार हे स्वतंत्र पक्षाचे प्रमुख आहेत. मग त्यांचा भाजपच्या यादीत समावेश कसा, असा सवाल विरोधकांनी केला होता.

शिवसेना शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांचा समवेश करण्यात आला होता. या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी यांच्यासह मित्र पक्षांच्या नेत्यांचा समावेश केला होता. या विरोधात तक्रारी निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.

Leave a Comment