मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. आता मनसे महायुतीच्या प्रचाराला जुंपणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे.
त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहे.
राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.
