Thane – ठाणे येथे गेल्या १२ वर्षांपासून वर्षा स्कूल ड्राईव्हींगच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या वर्षा संतोष पारधी यांचा “उषा सखी सन्मान” देऊन गौरविण्यात आले. ठाणे महापालिकेच्या लोकप्रिय नगरसेविका उषा भोईर यांच्या संकल्पनेतून या वर्षीपासून महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांसाठी “उषा सखी सन्मान” सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात शेकडो महिलांना उषा सखी सन्मानाने गौरविण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, आत्मन अकॅडमीच्या संचालिका मंजुश्री पाटील, युवा नेते विकेश भोईर आदि मान्यवरांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून उषा सखी सन्मान सोहळा ठाणे महापालिकेच्या लोकप्रिय नगरसेविका उषा भोईर आयोजित करत आहेत. तसेच विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांना गौरव करत शाबासकीची थाप देतात.
४० वर्षांपासून ठाणे महापालिकेत नगरसेविकेची जबाबदारी सांभाळून नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच महिलांना पाठबळ देण्याचेही उत्कृष्ट कार्य करत आहे. त्यामुळेच ठाण्यात नवीन ओळख उषा भोईर यांची झाली आहे. महिलांच कौतुक करण्यासाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या लोकप्रिय नगरसेविका उषा भोईर यांनी या वर्षीपासून ‘उषा सखी सन्मान’ सोहळा आयोजित करत हजारो महिलांचा सन्मान केला.
वर्षा स्कूल ड्राईव्हींगच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन एक ठसा उमटविल्याने वर्षा स्कूल ड्राईव्हींगच्या संस्थापिका वर्षा पारधी यांची उषा सखी सन्मान सोहळ्यात निवड करत सन्मानित करण्यात आले. वर्षा पारधी यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांचं विविध क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे. तसेच लोकप्रिय नगरसेविका उषा भोईर यांच्या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल सर्वत्र स्तरातून विशेष अभिनंदन केले जात आहे.
“विचारवंत लोकप्रिय नगरसेविका उषाताई भोईर यांच्या हस्ते मला “उषा सखी सन्मान” देऊन गौरविण्यात आले. गेल्या ४० वर्षांपासून जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या उषाताईंच उल्लेखनीय कार्य आहे. या वर्षीपासून त्यांनी महिलांचा सन्मान करण्यासाठी उषा सखी सन्मान सोहळा आयोजित करत हजारो महिलांचा सन्मान केला. या उपक्रमाबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते.”
वर्षा पारधी (संस्थापिका – वर्षा स्कूल ड्राईव्हींग)
