मेष : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृषभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : काही कामे धाडसाने पार पाडाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
तूळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.
वृश्चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
कुंभ : व्यवसायात वाढ होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
