बिग ब्रेकिंग! अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, अखेर चौकशीअंती….

बारामतीनंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. कारण, अजित पवार यांनी या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यासाठी शिंदे गटाकडून उमेदवारही आयात करण्यात आला आहे.या ठिकाणी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यात थेट लढत होत आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभेत आज खासदार अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. अपक्ष उमेदवार आफताब शेख यांनी धर्मेंद्र परदेशी यांच्यामार्फत तशी तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने यावर पडताळणी केली. अमोल कोल्हे यांनी स्वतः त्यांच्याही वकीलाशी बरीच चर्चा केली. अखेर चौकशीअंती अमोल कोल्हे यांचा अर्ज वैद्य ठरविण्यात आला आहे. यानंतर आता राजकारण सुरू झालं आहे.

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पुण्यातील विश्राम बाग पोलीस स्टेशनमध्ये एक गंभीर गुन्हा दाखल आहे, असं असताना त्याचा उल्लेख नामनिर्देशन पत्रात केला नाही, असा आक्षेप उपक्ष उमेदवाराने घेतला होता. या आक्षेपात तथ्य न आढळल्यानं निवडणूक आयोगाने कोल्हेंचा अर्ज वैध ठरवला

Leave a Comment