बाळासाहेब थोरातांचा भाऊसाहेब वाकचौरेंना अनुभवाचा सल्ला

संगमनेरातून लीड देण्याची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांची आहे. पण तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येईन, हे बोलू नका. आपल्याला लढावं लागणार आहे. तीन लाख म्हटलं की आमचा गडी थंड होतोय, पळत नाही जास्त.

त्यामुळे वाकचौरे गैरसमजात राहू नका, कृपा करा आमच्यावर. तुम्ही निवडून येणार आहे मात्र लोकांना समजून सांगावं लागेल. त्यामुळे तीन लाख-तीन लाख या चर्चा करू नका, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी वाकचौरे यांना दिला.

Leave a Comment