मोठी बातमी! साकूरमधील ठाकरे गटाचे ‘हे’ नेते भाऊसाहेब वाकचौरेंवर नाराज? शिंदे गटात….

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे रिंगणात आहेत. नुकताच प्रचाराचा नारळ फुटला आहे. तसेच त्यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे.

प्रचाराच अचूक नियोजन देखिल केलं आहे. मात्र ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारीच नाराज झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे पदाधिकारी भाऊसाहेब वाकचौरेंच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून येत नाही.

त्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्या मनात काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच नाराज पदाधिकारी शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना साथ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी भाऊसाहेब वाकचौरेंच टेन्शन वाढणार आहे. स्वपक्षातील पदाधिकारी नाराज असल्याने आगामी काळात निवडणूकीत नेमक्या काय घडामोडी घडणार हे कळणार आहे.

Leave a Comment