पुन्हा भाजपसोबत जाणार का?, उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा 

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग सोमवारी प्रसिद्ध झाला. खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत यावे. त्यांची स्वप्ने निश्चित पूर्ण होतील, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत कदापि जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मोदी यांनी महाराष्ट्राचा घात केलाय. त्यांच्याबरोबर हातमिळवणी कदापि शक्य नाही, असा विश्वासही त्यांनी जनतेला दिला.

उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय? या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकरे यांनी म्हटले आहे की, तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी? बाळासाहेबच मला युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये घेऊन गेले होते. तिथे छान सेट बनवले होते. जसे आपल्या नितीन देसाई यांनी बनवले होते. त्यात अशा भिंती, खिडक्या असतात आणि त्या खिडकीतून पाठी बघितलं तर टेकू लावलेले असतात, आत काहीच नसतं. अशी खिडकीचा काय उपयोग?.

Leave a Comment