बिग ब्रेकिंग! इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू 

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू (Ibrahim Raisi helicopter Crash) झाला. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रीही अपघातात ठार झाले. इराणी माध्यमांनी दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे.

हेलिकॉप्टर जिथं कोसळलं ते ठिकाण सापडलं असून हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले आहेत. अजरबैजानमधील घनदाट आणि पर्वतीय भागात रविवारी हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. या हेलिकॉप्टरमधून इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्र्यांसह इतर अधिकारी जात होते.

तेहरान टाईम्सच्या मते, इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टरचा समावेश होता, त्यापैकी दोन सुरक्षितपणे त्यांच्या ठरलेल्या ठिकाणावर पोहोचले, परंतु एकासोबत अपघात घडला. इराणची राजधानी तेहरानच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर (375 मैल) अंतरावर अझरबैजान देशाच्या सीमेवरील जोल्फा या शहराजवळ ही घटना घडल्याचे स्टेट टीव्हीने म्हटले आहे.

अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी रायसी रविवारी पहाटे अझरबैजानमध्ये होते. आरस नदीवर दोन्ही देशांनी बांधलेले हे तिसरे धरण आहे. इराण देशात विविध प्रकारची हेलिकॉप्टर उडवली जातात, परंतु आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इस्लामिक देशाला या हेलिकॉप्टरचे सुटे भाग मिळणे कठीण झाले आहे. त्याचा लष्करी हवाई ताफा देखील 1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्वीचा आहे.

Leave a Comment