नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील बाबासाहेब कुटे फाउंडेशनचे ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन आणि ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. तसलीम आसिफ चौगुले हिने साकुर केंद्रामध्ये शास्त्र शाखेत प्रथम क्रमांक पटकावून 82.67% मार्क मिळविले आहेत.
तसेच ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन आणि ज्युनिअर कॉलेज या विद्यार्थ्यांमध्ये 13 टक्के विद्यार्थी हे डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहे. तसेच प्रथम श्रेणीमध्ये 86% विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. तर द्वितीय श्रेणीमध्ये फक्त 1% म्हणजे एकच विद्यार्थी पास झाला आहे.
साकूर व पठार भागातील ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशन व जुनियर काॅलेज या शाळेचा शैक्षणिक दर्जा सर्वोत्कृष्ट असल्याचे पून्हा एकदा स्पष्ट अधोरेखीत झाले आहे. या पूर्वीची तीन वर्षांपासूनची 100%निकालाची परंपरा कायम राखली आहे.
त्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षकवृंदाचे व संथेचे अध्यक्ष बाबासाहेब कुटे, प्राचार्य शिवनाथ पानसरे, प्रा. शिरसाठ, प्रा.अमोल भोसले, प्रा.प्रशांत धुळगंड, प्रा.वैभव गाडेकर यांचे साकुर परिसरातील व पठार भागातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
