मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वैचारिक परिवर्तन होईल.
कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
धनू : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मीन : वाहने जपून चालवावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
