दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने केल ‘हे’ कृत्य, नगरमधील घटना

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका किराणा दुकानाची तोडफोड करून मोटारसायकल पेटवून देण्यात आली. महिलेचा विनयभंग केल्याची घटना राहुरी शहरातील मुलनमाथा येथे घडली.

या घटनेतील २४ वर्षीय तरुणाचे राहुरी शहरातील मुलनमाथा परिसरात किराणा दुकान आहे.

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सात ते आठ आरोपी अनाधिकृतपणे घरात घुसले. घरातील महिला व पुरुषांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी तरुणाच्या आईशी लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. घरातील सामानाची तोडफोड करून एक मोटारसायकल पेटवून दिली.

कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपी राकेश संजय माळी, रवि भिकन चरवंडे, लाला विक्रम माळी (सर्व रा. राहुरी बुद्रुक) व इतर ४ ते ५ अनोळखी तरुण अशा ७ ते ८ जणांवर घरात घुसून मारहाण व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विकास वैराळ हे करीत आहेत.

Leave a Comment