नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीत अनेक इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आल्याचा पाहायला मिळाला आहे.
भाजपकडून विवेक कोल्हे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात आता चुरस वाढल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेंद्र विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. राजकारण विरहित शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. विनाअनुदानित प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना अनुदानित करायचे आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दरबारी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न असेल त्यांनी मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
