महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल LIVE : अहमदनगरमधून निलेश लंके आघाडीवर

Loksabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान मतदान झाले. पाच टप्प्यात झालेल्या या मतदानानंतर राज्यातील जनतेला मतमोजणीचे वेध लागले होते. राज्यातील सर्वच मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला. आता ४८ मतदार संघात काय लागणार निकाल… त्याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे. निकालाची प्रत्येक अपडेट वाचा DSNews24 वर…

 

सर्व मतदार संघातील प्रत्येक अपडेट वाचा DSNews24 वर…

–  नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून 15 व्या फेरीअखेर निलेश लंके 15753 मतांनी आघाडीवर, भाजपा खासदार सुजय विखे पिछाडीवर!

 

– अहमदनगरमधून सुजय विखे 10 व्या फेरी अखेर 66,328 मतांनी आघाडीवर.

 

– बुलढाण्यात दुसऱ्या फेरीत रविकांत तुपकरांची अचानक उसळी

 

–  तिसऱ्या फेरीदरम्यान यवतमाळ वाशिम मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय देशमुख १२३६२ मतांनी आघाडीवर

 

– शिर्डीतून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे 14 हजार मतांनी आघाडीवर ; शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे पिछाडीवर

 

– वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, काँग्रेसचे अजय राय यांनी घेतली आघाडी

 

– अहमदनगरमधून तिस-या फेरीत सुजय विखे 12 हजार मतांनी आघाडीवर

 

– नाशिकमधून राजाभाऊ वाजे तब्बल 30 हजार मतांनी आघाडीवर, हेमंत गोडसे पिछाडीवर

 

– नाशिक दिंडोरी मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर भारती पवार पिछाडीवर

 

– शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे 2058 मतांनी आघाडीवर

 

– नगर दक्षिण : दुसरी फेरी निलेश लंके 2,192 मतांची घेतली आघाडी.  4 तालुक्यामधून सुजय विखे पुढे ! तर पारनेर आणि शेवगाव मधून लंके यांनी घेतली आघाडी.

 

– नगर दक्षिण लोकसभा – पहिली फेरी : लंके 18254, विखें 18444, विखें 190 आघाडी

 

– महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर…तिसऱ्या फेरीनंतर 5500 मतांनी आघाडी. संगमनेर , अकोले आणि कोपरगाव मध्ये वाकचौरे यांना आघाडी..

 

– दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळेंची मोठी आघाडी! अनिल देसाई 5616 मतांनी पिछाडीवर

– पुण्यात मुरलीधर मोहोळ आघाडीवर

– रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे आघाडीवर ;  काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे पहिल्या फेरीनंतर सुमारे 6000 मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख आघाडीवर

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८४ टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना ३ हजार ६२५ तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना ३ हजार ५४१ मते मिळाली आहे. ८४ मतांनी संजय देशमुख आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

 

अकाेला लाेकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे आघाडीवर

अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर रिंगणात उभे आहेत. यंदाची लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याची शक्यता निकालाच्या आधीपासूनच वर्तविण्यात येत हाेती. मात्र भाजपाने पहिल्या फेरीत आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

 

– नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर आहेत.

 

– बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

 

– सांगलीत अपक्ष विशाल पाटील आघाडीवर

 

– शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर

 

– अहमदनगरमधून सुजय विखे पाटील पाेस्टल मतदानात ६३७ मतांनी आघाडी घेतली, नीलेश लंके यांना ७८ मते मिळाली आहे

 

– शिरुरच्या लढतीत पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे 6 हजार आघाडीवर, तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

 

– बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी आली आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे पिछाडीवर आहेत. NDA च्या सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतली आहे.

 

– मुंबईतून उज्जल निकम, राहुल शेवाळे, पियूष गोयल आघाडीवर

 

– कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू महाराज १ हजार ३६ मतांनी पुढे

Leave a Comment