मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ‘या’ सहा जणांना मिळाले मंत्रिपद

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी ३.० सरकारमध्ये महाराष्ट्रातील एकूण ६ जणांना मंत्रीपद मिळाले आहे. यामध्ये भाजपच्या ४ आणि शिंदे सेनेच्या एका मंत्र्याचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात नागपूरचे नितीन गडकरी, मुंबईचे पीयूष गोयल, मुंबईचे रामदास आठवले, उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे, पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ आणि विदर्भातील बुलढाणामधून शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.

Leave a Comment