पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 9 ते 14 जून दरम्यान सातारा, सांगली तसेच पुणे, कोकण, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईतील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
याशिवाय या कालावधीत धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, बीड आणि परभणी या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. साधारणपणे आज पासून ते 14 जून पर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे.
सध्या मान्सून कोकण आणि मुंबईत दाखल झाला आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
