मुंबईला अतिवृष्टीचा इशारा 

मुंबई : हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. पुढील पाच दिवस पाऊस (Rain Update) राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सात ठिकाणी वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. प्रामुख्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment