अबब! माणसाने समुद्रात उडी मारली अन् शार्कने… काही क्षणातच

समुद्रात जाण्याची आणि सुट्टी एन्जॉय करण्याचीही एक वेगळीच मजा असते. परदेशातील शेकडो लोक सुट्टीसाठी समुद्रात फिरायला जातात. अनेकांना समुद्रात पोहायलाही आवडते, पण हाच समुद्र कधी तुमच्या जिवावर बेतेल याचा काही नेम नाही.

अशाच घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ हा 2000 सालचा असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्सही दिल्या आहेत.

घडले असे की, काही लोक मोठ्या जहाजातून समुद्रात फिरायला गेले होते. त्यांच्यात एक जोडपेही होते. त्या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने समुद्रात पोहण्याचा प्लॅनही बनवला होता. प्लॅननुसार पहिल्यांदा त्याने पाण्यात उडी मारली आणि काही क्षणातच होत्याचं नव्हते झाले. शार्क मासा पाण्याखाली लपून बसला होता, याची त्यांना अजिबातच कल्पना नव्हती. उडी मारताच त्या माणसाला पाण्यात लपलेल्या शार्कने गिळून टाकले. हा सर्व प्रकार जहाजावर असलेल्या त्याच्या पत्नीने पाहिला आणि ती एकदमच स्तब्ध झाली. आपल्या डोळ्यांदेखत शार्कने पतीला गिळून टाकल्याचे तिने डोळ्यांनी पाहिले होते. पण पाहण्याशिवाय ती दुसरे काहीच करू शकली नाही. थॅडियस कुबिंस्की असे या व्यक्तीचे नाव.

समुद्रात उडी मारणे ही एक साहसी कलाच म्हणावी लागेल, पण कधीकधी ते किती धोकादायक आणि प्राणघातक ठरू शकते ते या उदाहरणावरून समजू शकते. फक्त एका चुकीच्या निर्णयाने त्याचा जीव घेतला. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, शार्क पाण्याखाली लपून बसली होती. त्याने पाण्यात उडी मारताच शार्कने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या धडाचे तुकडे झाले.

थॅडियस कुबिंस्की हे 60 वर्षांचे होते. 9 फुट लांब आणि 400 पाउंड वजनी बुल शार्कने थॅडियस कुबिंस्की यांच्यावर हल्ला केला होता. शार्कने त्यांना चावा घेताच त्यांच्या हाडांचा चुरा झाला. एका क्षणात त्यांच्या शरीराचे तुकडे झाले. पण त्यांची पत्नी पाहण्याशिवाय दुसरे काहीही करू शकली नाही. हा प्रसंग ‘जॉज’ चित्रपटाची आठवण करून देणारा आहे. पण जे घडलं ते धक्कादायक होते.

फ्लोरिडा विद्यापीठातील इंटरनॅशनल शार्क अटॅक केस’चे संचालक सागरी जीवशास्त्रज्ञ जॉर्ज एच. बर्गेस यांनी टॅम्पा बे टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार , “शार्क अन्नाच्या शोधात आली होती. ती तिचे सामान्य जीवन जगत होती. कुबिंस्की तिच्या तावडीत सापडले. शार्कच्या एका हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. युरोपमध्ये दरवर्षी अशा लाखो घटनांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू होतो.”

Leave a Comment