सर्वसामान्यांना झटका! दूधाच्या दरात ‘इतक्या’ रूपयांनी वाढ

सर्वसामान्यांना आता दुधाने आणखी एक झटका दिला आहे. कर्नाटकातील दूध महाग झाले आहे. कर्नाटकदूध महासंघाने नंदिनी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. तर दुसरीकडे आता प्रत्येक पॅकेटमध्ये ५० मिली अतिरिक्त दूध मिळणार आहे.

वाढीनंतर, दुहेरी टोन्ड दुधाची किंमत १०५० मिलीसाठी प्रति लिटर ४४ रुपये होईल. कर्नाटकमध्ये बुधवार, २६ जूनपासून नंदिनी दुधाच्या पॅकेटच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या सुधारित किमतीसह, कर्नाटक दूध महासंघाने प्रत्येक पॅकेटमध्ये ५० मिमी अतिरिक्त दूध देण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे, एक लिटर दुधाच्या पाकिटात १०५० मिली दूध आणि अर्ध्या लिटर दुधाच्या पाकिटात ५५० मिली दूध असणार आहे.

एका वर्षाच्या आत कर्नाटकातील ही दुसरी दरवाढ आहे. गेल्या वर्षी जुलै २०२३ मध्ये कर्नाटक मिल्क फेडरेशनने दुधाच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली होती.

Leave a Comment