कर्नाटक राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ केली आहे. ‘कर्नाटक सेल्स टॅक्स’ (KST) मध्ये दुरुस्ती केल्यानंतर ही वाढ झाली आहे. कर्नाटक राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलवरील विक्रीकरात २९.८४ टक्के आणि १८.४ टक्के वाढ केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढीवरून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत खटाखट, टकाटक लूट सुरू झाल्याचे म्हटले आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, कर्नाटकात परिस्थिती बदलत आहे. याचबरोबर पेट्रोल ३ रुपयांनी महागले आहे. तर टकाटक-टकटक डिझेल ३.२० रुपयांनी महागले आहे.
