विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (ता. 27 जून) सुरू झाले आहे. विधानसभेच्या कामकाजाची (Assembly Session) सुरुवात ही जनगण आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने झाली. त्यानंतर विधानसभा ॲड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विधानसभा अध्यक्षांची तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांची निवड जाहीर केली आहे.
विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून दोघांना संधी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या एका आमदाराची वर्णी लावण्यात आली आहे. तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून आमदार कालिदास कोळंबकर, समाधान आवताडे, शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून किरण लहामटे आणि काँग्रेसकडून अमिन पटेल या पाच आमदारांची निवड तालिका अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.
