राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. आज रात्री पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे येथे टँकर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मुत्यू झाला असून तिन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज रात्री पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे येथे भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. टँकर आणि कारमध्ये समोरा-समोर धडक होऊन ही घटना घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
किशोर पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून सातारा जिल्ह्याच्या कराडमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारसह ट्रॅक्टरचाही चक्काचूर झाला.
