पुणे – वाढदिवस (Birthday) हा प्रत्येकासाठी स्पेशल (Special) असतो. प्रत्येकाची वाढदिवस साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही जण एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन, तर काही जण पारंपरिक पद्धतीनं वाढदिवस साजरा करतात. तसेच चिमुकल्यांचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत देखील वेगळीच असते.
विशेषतः चिमुकल्यांचा वाढदिवस साजरा केला तर एक वेगळाच आनंद मिळतो. असाच एक छानसा उपक्रम पिंपरी चिंचवडमधील राहाटणी येथे नव्यानेच सुरू झालेल्या गुरू ग्लोबल स्कूल मध्ये राबविण्यात आलाय. Play Group मधील प्रांशी प्रशांत कुंजीर या चिमुकलीचा वाढदिवस अतिशय सुसज्ज वातावरणात थाटामाटात साजरा करण्यात आलाय. यावेळी छानस डेकोरेशन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक सतिश देशमुख, प्रशांत कुंजीर, अक्षदा कुंजीर तसेच टिचर सुवर्णा मिलिंद नन्नावरे, नम्रता अनिल जाधव, कर्मचारी कोमल विनोद नाईकनवरे, सुनिता अनिल जोगदंड व चिमुकले उपस्थित होते.

Nice celebration Guru Global Preschool, Rahatani !!