जुन्नर : येथील नगर कल्याण महामार्गावर एस.टी.बस व कारच्या अपघातात कार मधील दोन जण जागीच ठार झाले तर एस टी बस मधील १८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.
हा अपघात रविवारी सकाळी पावणे एकरा वाजेदरम्यान ओतूर गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर वाघिरे महाविद्यालया समोर झाला आहे.
या अपघातात महेश तानाजी गायकवाड,वय २३, रा. विद्यानगर,मोहोळ,ता. मोहोळ जि.सोलापूर व प्रतीक अशोक शिर्के, वय २२, रा.नारळा पैठण, जि. संभाजीनगर हे दोघे ब्रीझा कार मधील ठार झाले आहे.
तर उषा गणेश मंद्रीवाळ वय ५० रा.चाकण, मंगेश रामदास हिलम वय ३२ रा.डिंगोरे, रंजना मंगेश हिलम वय ३२ रा.डिंगोरे ता.जुन्नर,जि.पुणे, शुभम भानुदास हजारे, पिंपळनेर ता.पारनेर जि.अहमदनगर, जालिंदर भाऊसाहेब रासकर वय २२ रा.पिंपळनेर ता. पारनेर,जि.अहमदनगर, स्मिता बुधवा किरके वय २७ ओडीसा, सिता करकट्टा उजीत वय २१ ओडीसा, महिमा सिलबानूस बागे वय १९ ओडीसा, संगीता सुक्का टोपव वय १८ ओडीसा,सोमनाथ दत्तात्रय डफेदार वय ५५ रा.संगमनेर,जि.अहमदनगर, अजिंक्य गोरख साठे वय २३ रा.पिंपळनेर ता.पारनेर,जि.अहमदनगर, प्रज्वल योगेश पुजारी वय २२ रा.पुणेवाडी ता.पारनेर,जि.अहमदनगर, इर्षाद कादर शेख वय.२० पिंपळगाव तुर्क ता.पारनेर जि.अहमदनगर, पिंकी चिमा मनेरा वय.४३ रा.कावेसर,वाघठिल जि.ठाणे, सुलोचना चिमा मनेरा वय.६० रा.कावेसर,वाघठिल जि.ठाणे, पोर्णिमा अजय खोडांवर.३७ रा.किनी ता.पारनेर जि.अहमदनगर, अजय धोंडीभाऊ खोडदे वय.४० रा.किनी ता.पारनेर जि.अहमदनगर, अर्जून रामजी मेमाणे वय.३५ रा.खिरेश्वर ता.जुन्नर जि.पुणे हे या अपघातात जखमी झाले आहे.
अपघाताबबत ओतूर पोलीसाना एस टी चालक रमेश वसंतराव मोरे वय.४६ रा.वडझिरे व वाहक अशोक माधव तांबे वय.३५ रा.गोरेगाव (दोघांनी ही ता.पारनेर जि.अहमदनगर) यांनी माहिती दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओतूर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालया समोर पारनेर ते मुंबई सेंट्रल (एस.टी.बस क्र.एम एच १४ बी टी ४२८०) ही बस मुबंई कडे जात होती त्याच वेळी मारूती सुझुकी ब्रीझा कार (क्र. एम एच ४६ सी एम २१५५) ही कार ओतूर कडून आळेफाट्या कडे आली होती.वाघिरे महाविद्यालयात जवळ एस टी बस व कारची धडक होऊन अपघात झाला.या अपघातात ब्रीझा कारचे मोठे नुकसान झाले असून एस.टी.बस ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात गेली.अपघाता ब्रीझा कार मधील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा उपचारादरम्यान मयत झाला.
