संगमनेर : मुळा नदी दुथडी वाहू लागली

संगमनेर : दक्षिण नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचेे पाणी, व्यापार आणि नगर एमआयडीचे भवितव्या अवलंबून असलेल्या मुळा धरणाच्या अकोलेतील पाणलोटात कालपासून आषाढ सरींनी जोर धरल्याने अकोलेत मुळा नदी दुथडी वाहू लागली आहे.

हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित परिसरात जोरदार सरी बरसत असल्याने काल तासागणिक कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग वाढत होता. शुक्रवारी सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा निसर्ग 3212 क्युसेकने सुरू होता. पण दुपारनंतर पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तो सायंकाळी 2247 क्युसेकपर्यंत खाली आला होता. शनिवारी सकाळीही तीच अवस्था होती. पण त्यानंतर आषाढ सरींचे तांडव सुरू असल्याने सायंकाळी मुळा नदी दुथडी वाहत होती. कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 13375 क्युसेक होता.

पाणलोटात पावसाचा जोर टिकून असल्याने प्रथमच मुळा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे. काल सकाळपर्यंत 92 दलघफू पाणी दाखल झाले होते. आज पाण्याची आवक वाढणार आहे. दरम्यान, पावसामुळे भात खाचरांमध्ये पाणी साचू लागल्याने भात आवणीच्या कामात शेतकरी गुंतला आहे.

Leave a Comment