हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
