मोठी बातमी! शरद पवार गटाच्या ‘या’ आमदाराच महायुतीला मतदान, नाव आलं समोर

विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. क्रॉस व्होटिंग झाल्याने पाटील यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसच्या कोट्यातील सात मते फुटली. ही मते महायुतीला गेली.

पण शरद पवार गटाचंही एक मत फुटलं आणि त्यामुळे जयंत पाटील यांना पराभूत व्हावं लागलं असं सांगितलं जात आहे. स्वत: जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार गटाच्या कोणत्या आमदाराने मतदान केलं नाही, त्याचं नावच जयंत पाटील यांनी जाहीरपणे घेतलं आहे.

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना या आमदाराचं नाव घेतलं. शरद पवार गटाकडे 12 मते होती. त्यातील 11 मते मला मिळाली. एक मत माझ्या मित्राचं होतं. त्यामुळे माझ्या मतांची संख्या 12 झाली. आमदार मानसिंग नाईक यांचं मत फुटलं. नाईक मतदानाला आयत्यावेळी आले. मिटिंगला आमच्यासोबत होते. मतदान करण्यापूर्वी आम्हाला भेटून गेले. पण मला मत दिलं नाही. कोण कोणाला मतदान करतं ते कळतं. जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड ही पक्षाची भक्कम मते मला मिळाली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

Leave a Comment