जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे कल्याण नगर महामार्गावर ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली. अंत्यविधीवरुन परतत असताना अपघात झालाय. गावातील व्यक्तीची अंत्यविधी कार्यक्रम संपल्यानंतर रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडलं. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. रास्ता रोकोची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
नक्की काय घडलं?
जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे ग्रामस्थ एका व्यक्तीच्या अंत्यविधिवरून परतत होते. त्यावेली त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने चिरडलं. यामध्ये पाचजणांचा मृत्यू झालाय तर ८ जण गंभीर जखमी झालेत. कल्याण नगर महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय. जखमींना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात
या अपघातानंतर गावात तणावाचं वातावरण आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं समोर आलंय. अपघातानंतर नागरिकांचा कल्याण नगर महामार्गावर रास्तारोको सुरु आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाल्याची माहिती मिळतेय. अंत्यविधीवरुन परततानाच काळाने घाला घातला आहे. भरधाव ट्रकने चिरडल्यामुळे एकाच वेळी ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण-नगर मार्गावर हा भीषण अपघात झाल्याचं आज समोर आलंय.
