नाशिक(DSNews24) ज्ञानेश्वर सांगळे) पौराणिक काळापासुन वटवृक्षाला मानवी जिवनामध्ये निसर्गामध्ये अन्यन्य साधारण महत्त्व आहे. पुर्वजनांना ह्या वृक्षाचे महत्व आणि पावित्र्य चांगलेच ठाऊक होते. ह्याच वृक्षाखाली बसुन सिद्धांर्थाचे बोधीसत्व गौतमात रुपांतर झाले. इतिहासातील सत्यवानाला मृत्यूच्या वाटेवरुन परत आणणारी साविञीस त्या काळी माहिती होतं की वडाचे झाड हे एक नैसर्गिक व्हेंटीलेटर आहे. कारण एक चांगले वाढलेले झाड एका तासाला सातशे बारा किलो आॕक्सीजन ची निर्मिती करते. हजारो पक्षांचे हक्काची घरं जपणारं हे एकमेव झाड. कित्येक आजारांवर औषधे देणारा हा वृक्ष. दिवसेंदिवस मानुस माञ निसर्गापासुन दुर चाललाय. स्वार्थासाठी बेसुमारपणे निसर्गाची कत्तल करणाऱ्या आजच्या मानवाचा अमानुष चेहरा आतातरी मानसांनी बदलायला हवं. निसर्गाला जपणं म्हणजेच देव जपणं अशाच संकल्पनेतुन धारणगांव खडकचे बाबासाहेब जाधव, विक्रम खलाटे, मधुकर जाधव, समाधान जाधव, नामदेव झाल्टे, विकास जाधव, विलास वाळुंज, प्रशांत जाधव, राजाराम जाधव, शरद जाधव, युवराज वाघ, एकनाथ झाल्टे, समाधान जाधव, श्रावण जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सचिन जाधव, नवनाथ जाधव, अमित जाधव, प्रसाद जाधव हे ग्रामस्थ एकञ आले आणि वडांच्या झाडांचे वृक्षारोपन करुन वृक्षवल्ली आम्हां सगे सोयरे वनचरे ह्या संताचा सामाजिक संदेश जनमानसांत पोहचविला.
धारणगांव खडकच्या देवभुमीत पुर्वी अकरा वडाची झाडे होती. हा परिसर आजही अकरावड म्हणुन प्रसिद्ध आहे. बाजुलाच आहिल्यादेवी होळकर ह्यांच्या काळातील ऐत्याहासिक बारव आजही सुस्थितीत आहे. तिथच गोसावी बाबांची जिवंत समाधी आहे. अकरा वटवृक्षापैकी एक वटवृक्ष तत्कालीन काळाची साक्ष देत येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंना बघतो आहे. अशीही अख्ख्यायिका ऐकण्यात येते कि, इंग्रज काळातही महाराष्ट्रभर दोन अट्टल चोर ना-या आणि किसन्या ह्याच परिसरात राहायचे. म्हणूनच ना-या किसन्याचं धारणगांव का अशी ओळख बघायला मिळते. ह्याच वटवृक्षांवर पिंगळं राञीचे रहिवासा करायचे..हाळुहळु काळ बदलत गेला माञ काळाच्या ओघात अजुनही पाऊलखुणा तशाच आहेत. त्याच इतिहासाची ओळख असलेले तसेच निसर्गसंवर्धनाची जबाबदारी घेऊन ग्रामस्थ एकञ आले. आणि अकरावडांचे परत रोपण करुन पुसट होत चाललेली ओळख परत मिळवायची. वृक्षांचं संवर्धन करुन गावास निसर्ग संपन्न करायचं असं ठरवुन यशस्वीपणे सर्वांनी वृक्षारोपन केले. सर्व स्थरांवरुन ग्रामस्थांकडुन ह्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. धारणगांव खडक चे पोलिस पाटील राहुल सोनवणे ह्यांनी अकरावड ह्या ठिकाणी भेट देऊन सर्व वृक्षप्रेमी मिञांचे अभिनंदन केले तसेच असेच उपक्रम ग्रामस्तरावर सर्वांनी करण्याचे अवाहन केले.
