मुळा धरण ‘इतके’ टक्के भरले

मुळा नदी पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. कालही या परिसरात पावसाची संततधार सुरूच होती. यामुळे यावर्षीची 29 हजार 533 क्युसेसची सर्वाधिक पूर पातळी काल गुरुवारी मुळा नदीने ओलांडली. नदीच्या पूर पातळीमुळे मुळा धरणाकडे मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता 12,980 दशलक्ष घनफूट पार गेला असून रात्री या धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या पुढे गेला.

धरणाकडे सकाळी सहा वाजता कोतूळ येथून 29 हजार 533 क्युसेस विक्रमी आवक सुरू होती व सकाळी नऊ वाजता 20,828 क्युसेस आवक सुरू होती. तर सायंकाळी सहा वाजता आवक कमी होऊन ती 9,541 वर आली. रात्री 11 वाजता विसर्ग 11152 दलघफू झाला आहे. जोरदार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. संततदार पावसाने परिसरातील जनजीवन गाठून गेले आहे.

आदिवासी भागात उर्वरित भात लावण्या अंतिम टप्प्यात आहे. ओढे नाले ओसंडून वाहत आहे निसर्ग ओलाचिंब झाला आहे. ओढे नाले सक्रिय झाल्याने परिसरातील सौंदर्य मिळण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे भर पावसात पावसाचा आनंद घेण्यासाठी फोफसंडी व हरिश्चंद्रगड परिसर पर्यटकांना खुणावत आहेपावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी घाट माथ्यावर पर्यटक रेंगाळताना दिसत आहेत

Leave a Comment