मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ भाजप आमदाराचा राजीनामा 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे, भाजपची विधानसभा सदस्यांची संख्या एकाने कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत खासदार बनलेल्या 8 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर, लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. आता, हरिभाऊ बागडे यांनाही मोठी संधी मिळाल्याने त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राजस्थानचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 जुलै रोजी देशात अनेक राज्यपालांची नियुक्ती केली. त्यातील काही नेते महाराष्ट्रातील आहेत. त्यापैकी एक म्हणजे हरिभाऊ किसनराव बागडे. हरिभाऊ यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, भाजपने हरिभाऊ बागडेंना मोठी संधी दिली असून थेट राज्यपालपदाची जबाबदारी आता त्यांच्यावर देण्यात आली आहे. हरिभाऊ बागडे यांच्या राजीनामामुळे आता, फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या इच्छुक उमेदवारांची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहेत

Leave a Comment