बिग ब्रेकिंग! पारनेर – संगमनेरचा संपर्क तुटला, साकूरनजिक मांडवे पुल पाण्याखाली

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) अकोले तालुक्यातील मुळा नदीचा उगम असणाऱ्या हरिशचंद्रगड या मुळाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊसाची हजेरी सुरू आहे. त्यामुळे मुळा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील 

साकूरनजीक असणारा मांडवे पुल पाण्याखाली गेला आहे. तसेच पुल पाण्याखाली गेल्याने पारनेर – संगमनेरचा तुटला आहे. त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

संगमनेर आणि पारनेर या दोन्ही तालुक्यांत जाण्यासाठी मुळा नदीवर मांडवे पूल असून नदीला आज अचानक पाणी वाढले. तसेच मांडवे पुल पाण्याखाली गेला आहे. येणारी जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच मुळा नदीला आलेला पूर बघण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

Leave a Comment