पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारच्या दुःखद दिवसानंतर आज आनंदाचा क्षण आला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. कांस्यपदकाच्या प्लेऑफ सामन्यात भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला.
ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचे हे सलग दुसरे पदक आहे. याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर भारताने श्रीजेशला संस्मरणीय निरोप दिला.
