मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
मिथुन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
तूळ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ : गुरुकृपा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
