साकूर हादरले! पती – पत्नीची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. साकूर जवळील बनातील मांगमळी येथील पती – पत्नीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बनातील महालदरा येथे रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ नंतर घडलीय.

वैभव दत्तात्रय आमले (वय २२) व स्नेहा वैभव आमले( वय २०) असे आत्महत्या केलेल्या पती – पत्नीच नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेच्या ठिकाणी शेकडो नागरिकांनी गर्दी केली आहे. घटनास्थळी घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे यांनी धाव घेतली आहे. तसेच घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह संगमनेर येथील कुटिर रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. मात्र पती पत्नीने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. पुढील तपास घारगाव पोलिस करत आहे.

दरम्यान तीन महिन्यांपूर्वी हे दोघे विवाहबद्ध झाले होते. तसेच दोघेही पुण्यात नोकरी करत होते. दोन दिवसांपूर्वी दोघेही आपल्या गावी साकूरला आले होते.

Leave a Comment