आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतही हेवेदावे सुरु झाले आहेत.
दुसरीकडे पृथ्वीराज च्व्हाण यांनी ज्या पक्षाच्या सर्वात अधिक जागा असतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य केलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला दुर्लक्ष करता येणार नसल्याचं भाष्य शरद पवारांनी केलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवारांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या विधानाबाबत भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मांडलेली भूमिका दुर्लक्ष करण्याजोगी नाही. ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, असा संकेत आहे, अशी भूमिका चव्हाण त्यांनी मांडली होती.
