बिग ब्रेकिंग! विधानसभेआधी काँग्रेसने बाळासाहेब थोरातांना दिली मोठी जबाबदारी 

राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत राजकारण्यांपैकी एक आहेत. शांत आणि मनमिळावू स्वभावाचे नेते म्हणून ते सर्वपरिचित आहेत. क्वचितच ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात.

ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या संगमनेरला ‘शैक्षणिक नगरी’ म्हणून ओळखलं जातं. यामुळेच काँग्रेस पक्षाने त्यांना कायम मानाचं स्थान दिलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा ही गोष्ट समोर आली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसचा विश्वास कायम

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचा बाळासाहेब थोरात यांच्यावर विश्वास कायम असल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या वर्किंग कमेटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. मोहम्मद आरिफ नसीम खान यांना CWC चा स्पेशल आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सैयद मुजफ्फर हुसैन यांना महाराष्ट्र काँग्रेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्ष पदी स्थान देण्यात आलं आहे.

राहुल गांधींचे विश्वासू

बाळासाहेब थोरत हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्यावर राहुल गांधींनी अनेक जबाबदाऱ्या टाकल्या. थोरात यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे प्रभारी म्हणूनही काम पाहिलं. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ते छाननी समितीत होते. या शिवाय त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं. बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसचा पुढचा मुख्यमंत्री म्हणूनही पाहिले जाते.

प्रदीर्घ काळ राजकारण

गेली 40 वर्षे बाळासाहेब थोरात संसदीय राजकारणात आहे. 1985 ते 2019 पर्यंत ते संगमनेरचं नेतृत्व करत आहेत. 1985 मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते. या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकाही निवडणुकीत त्यांचा कधी पराभव झालेला नाही. ते आठव्यांदा संगमनेरचे आमदार झाले. एका मतदारसंघाचं इतक्या प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. बाळासाहेब थोरात अत्यंत कमी वयात आमदार झाले. पंधरा वर्षे मंत्री पद, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता उद्धव ठाकरे अशा 5 मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलंय.

Leave a Comment