श्रीरामपूर – हरेगाव फाटा येथे महंत रामगिरीजी महाराज यांचे जल्लोषात स्वागत 

श्रीरामपूर – तालुक्यातील हरेगाव फाटा या ठिकाणी श्रीक्षेत्र सराला बेट गोदावरी धाम मठाधिपती गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची तसेच गुलाब पुष्प यांची उधळण करण्यात आली.  माजी आमदार भाऊसाहेब कांबळे श्रीराम सेवा संघाचे सागर बेग माजी सरपंच आबासाहेब गवारे राजेन्द्र गवारे शिवसेना संतोष डहाळे विश्वस्त मधुकर महाराज हभप रामभाऊ नादिकर रावसाहेब वेताळ शुभम ताके जेसीबी संघटनेचे मनोज गवारे संभाजी देवकर दिनेश यादव सुनिल खैरनार अनिल अनारसे भैय्या पवार आण्णासाहेब गवारे पत्रकार भाऊसाहेब काळे राजेन्द्र देसाई तसेच श्रीरामपुर वडाळा महादेव शिरसगाव निपाणी वडगाव येथील हजारो तरुण भाविक भक्त यांनी महंत रामगीरीजी महाराज यांचा सन्मान केला.

यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी स्वागत करत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचा कृपा आशिर्वाद घेतला श्रीराम सेवा संघाचे सागर बेग यांनी हजारो तरुण बांधवाचे आभार व्यक्त केले. यावेळी जय श्रीराम नामाच्या जयघोषाने परीसर दुमदुमुन गेला होता पोलिस उपनिरीक्षक दादाभाई मगरे पोलिस हवालदार संतोष परदेशी पो ना किरण टेकाळे वसिम इनामदार प्रविण कांबळे यांनी चोख बंदोबस्त बजावला.

Leave a Comment