शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अंबादास दानवे(Ambadas Danve) माझ्या संपर्कात आहेत, कधीही काही होऊ शकतं. अंबादास दानवे यांचा मला कॉल आला असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित मेळाव्यात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शिरसाट?
शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यांचा मला कॉल आला होता. केव्हाही काही होऊ शकतं असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
तसेच त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. आमच्या मागे गर्दी नाही तरी इथे इतके लोक कसे जमले. उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही ओवैसी यांचा निषेध केला नाही, अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
