सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, घडली मोठी घडामोड

नाशिक जिल्ह्यातील १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत महिला आघाडीने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मालेगावमध्ये सभा आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश हा उद्धव ठाकरेंना धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकच्या १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. नाशिकमध्ये ठाण्याप्रमाणे संघटना बांधण्याचे काम केले जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासोबतच नाशिकच्या विकासासाठी ठाण्याप्रमाणेच पॅकेज देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी नाशिक शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, त्यामुळे हे आपलं सरकार आहे. सर्वसामान्यांसाठी काम करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून मी कायम तुमच्यासोबत राहणार असेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, माजी नगरसेविका अॅड. श्यामला दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, महिला आघाडी शहर समन्वयक ज्योती देवरे, माजी शिक्षण मंडळ सभापती व उप महानगर प्रमुख शशिकांत कोठुळे, उप महानगर प्रमुख शरद देवरे,उप विभाग प्रमुख कुमार पगारे, पिंटू शिंदे, विधानसभा संघटक पश्चिम अनिता पाटील, उप विभागप्रमुख आशा पाटील, शाखा प्रमुख सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश भार्गवे, नगरसेवक सुदाम डेमसे, सचिन भोसले, शिवा ताकाटे, योगेश बेलदार, आनंद फरताळे, रोशन शिंदे यांच्यासह महिला संघटक, १७ सरपंच, सभापती यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Leave a Comment