मेष : उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
वृषभ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
मिथुन : नवीन परिचय होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कन्या : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तूळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मन आनंदी आणि आशावादी राहील.
वृश्चिक : हितशत्रूंवर मात कराल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मकर : मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
