ऑगस्ट महिना संपत आला असून सर्वांना गणेशोत्सवाचा महिना असलेल्या सप्टेंबरचे वेध लागले आहेत. या महिन्यात गणेशोत्सवा बरोबरच इतरही अनेक सण असल्यानं सुट्ट्यांची रेलचेल आहे. या महिन्यात बँका एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत.
सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त सप्टेंबर महिन्यात प्रादेशिक आणि धार्मिक उत्सव आहेत. त्याशिवाय दोन शनिवार आणि पाच रविवार सुट्टी असणार आहे. भारतातील बँकांच्या सुट्ट्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या आहेत. आठवड्याच्या सुट्टीसह कमीतकमी १४ सुट्ट्या आहेत. माहितीसाठी वेळीच आपल्या स्थानिक बँकेच्या शाखेशी सुट्टीच्या यादीची माहिती घेऊन त्यानुसार बँकेशी संबंधित कामाचं नियोजन करणं उपयुक्त ठरेल.
सप्टेंबरमधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी
१ सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत
७ सप्टेंबर – विनायक चतुर्थी – संपूर्ण भारत
८ सप्टेंबर – रविवार / नुआखाई – संपूर्ण भारत / ओडिशा
१३ सप्टेंबर – रामदेव जयंती / तेजा दशमी (शुक्रवार) – राजस्थान
१४ सप्टेंबर – दुसरा शनिवार / ओणम – संपूर्ण भारत / केरळ
१५ सप्टेंबर – रविवार / तिरुवोणम – संपूर्ण भारत / केरळ
१६ सप्टेंबर – ईद ए मिलाद (सोमवार) – संपूर्ण भारत
१७ सप्टेंबर – इंद्र जत्रा (मंगळवार) – सिक्कीम
१८ सप्टेंबर – श्री नारायण गुरु जयंती (बुधवार) – केरळ
२१ सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी (शनिवार) – केरळ
२२ सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत
२३ सप्टेंबर – वीर बलिदान दिन (सोमवार) – हरियाणा
२८ सप्टेंबर – चौथा शनिवार – संपूर्ण भारत
२९ सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत
