मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब थोरात भला माणूस, पण…

महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सवी सोहळा विधान भवनात मंगळवारी (ता.03 सप्टेंबर) पार पडला. यावेळी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठी गेल्या सहा वर्षातील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेतील शतक महोत्सवी कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांचं स्वागत केलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असून त्यांचं आयुष्य संघर्षातून गेलं आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं. तर ज्या आमदारांना त्यांच्या सभागृहातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला त्यांची नावं वाचताना मुख्यमंत्र्यांनी चांगली फटकेबाजी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असून त्यांचं आयुष्य संघर्षातून गेलं आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं. तर ज्या आमदारांना त्यांच्या सभागृहातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला त्यांची नावं वाचताना मुख्यमंत्र्यांनी चांगली फटकेबाजी केली.

विधान भवनात बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “वक्ता सत्ताधारी पक्षात असो किंवा विरोधी बाकावर त्याच्या भाषणात सर्वसामान्य माणसाविषयची तळमळ असावी लागते. सत्ता संघर्षात अनेकदा एकमेकांवर टीका करावी लागते. विनाकारण टीका होत असेल तर लोकांना त्या वक्त्याचा दर्जा कळतो. त्यामुळे सर्व आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा इथे सन्मान केला जात आहे.

बाळासाहेब भला माणूस आहे, पण…

यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे लोक आहेत. ‘बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे देखील आहेत. बाळासाहेब भला माणूस आहे, पण चुकीच्या ठिकाणी आहेत.’ अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी नीलमताई गोऱ्हे, नरहरी झिरवळ, आशिष शेलार, गोपिचंद पडळकर यांची नावं घेतली. तर भरत गोगावले यांची ओळख करुन देताना, ‘ओठात एक आणि पोटात एक असं नसणारे, आहे ते उघड स्पष्ट बोलणारे, आमचे भरतशेठ गोगावले आहेत,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

सुनील प्रभू येता येता राहिले

यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचं नाव वाचताना ‘सुनील प्रभू देखील आहेत, ते येता येता राहिले आहेत.’ असं मुख्यमंत्री म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यामुळे उत्कृष्ट भाषणासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी टाईमिंग साधत तुफान फटकेबाजी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

Leave a Comment