छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.
वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असं या दोन्ही मायलेकींचं नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दुधारे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत होते. रात्री सर्व कामे आटपून मुलगी पल्लवीने तिच्या आईच्या हातावर मेहंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले. मात्र सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई न दिसून आल्याने तिने आसपास शोध घेतला. शेवटी तरंगलेला आईचा मृतदेह विहीरीत दिसला. याच धक्क्यातून मुलीने कोणताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
