बिग ब्रेकिंग! महाराष्ट्राला हायअलर्ट, मोठा इशारा

राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे, हवामान विभागाकडून आज देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधून -मधून सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाड्यात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या पावासाच कापसाला मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी मोठं नुकसानं झालं. पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावासाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment