अजित पवार गटाला मोठा धक्का, बडा नेत्याचा “या” पक्षात प्रवेश

आगामी विधानसभा निवडणूक येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याआधी विविध नेते आपल्याला उमेदवारी कोणत्या पक्षातून मिळेल याची चाचपणी करुन पक्ष प्रवेश करत आहेत.

यात सर्वात आघाडीवर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठी स्पेस निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाने भाजपला अनेक मतदारसंघात धक्का दिला आहे. यानंतर विदर्भात अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.

अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार भुसारा, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, गडचिरोली जिल्हाध्यक्ष पवार यांची उपस्थितीती होती.

Leave a Comment