बाळासाहेब थोरातांचा मोठा दावा, विधानसभा निवडणुकीत जिंकणार ‘एवढ्या’ जागा

मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं (MVA) जागा वाटप योग्य मार्गावर असल्याचं म्हटलं आहे.

आमची आतापर्यंत 125 जागांवर सहमती झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक जिंकणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. मविआ 288 पैकी 180 जागा जिंकेल , असं बाळासाहेब थोरात यांनी ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा दावा करण्यासोबतच बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेबद्दल देखील माहिती त्या मुलाखतीत दिली आहे. मविआच्या जागा वाटपाच्या चर्चा अनंत चतुर्दशी नंतर पुन्हा सुरु होतील, असं ते म्हणाले. मविआची प्रचार मोहीम कशी असेल याबाबतचा निर्णय देखील त्यानंतर घेण्यात येईल, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

Leave a Comment