देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. फडणवीसांनी मनापासून प्रयत्न करेन असं सांगितलं होतं. फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं, असे देखील एकनाथ खडसे म्हणाले.
दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्यानं भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं देखील एकनाथ खडसेंनी “माझा कट्टा” कार्यक्रमात सांगितलंय.
एकनाथ खडसे म्हणाले, मला एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. तुम्ही म्हणता ना पंकजाला न्याय झाला तसाच न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो.
त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. मी म्हटलो राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झालं मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिली होते. साधारण ही गोष्ट 2019 सालातील आहे.
