बिग ब्रेकिंग! बाळाचे बारस आटोपून जाताना भीषण अपघात, चौघांचा मृत्यू 

छत्रपती संभाजीनगर : दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या युवकांच्या स्कॉर्पिओने जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात चौघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.

अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात होते. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या युवकांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ ही घटना घडली.

दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून कुटुंब पुण्याकडे जात असताना ही हृदयद्रावक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले.

अपघातात मृणालिनी अजय बेसरकर (वय 38), आशालता हरिहर पोपळघट (वय 65), अमोघ बेसरकर (सहा महिने), दुर्गा सागर गीते (वय 7) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजय अंबादास बेसरकर (वय 40), शुभांगिनी सागर गीते (वय 35) या जखमी झाल्या आहेत.

विशाल चव्हाण नावाच्या चालकाने कृष्णा केरे याला गाडी चालवायचे लायसन नसताना गाडी चालवण्यास दिली. कृष्णा केरे हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल ज्ञानेश्वर चव्हाण असे आरोपी चालकाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत कृष्णा कारभारी केरे हा मुलगा होता. चालकाचे वय २२ वर्षे असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानासुद्धा नसल्याचे समोर आले आहे.

अपघाताच चौघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कार कृष्णाच्या नावावर असून त्याने विशालला मद्यधुंद असताना आणि लायसन नसूनही चालवण्यास दिल्या प्रकरणी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment